१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा धमाल विनोदी चित्रपट मु. पो. बोंबीलवाडी रसिकांनी चित्रपटगृहात जावून पहावा.

0
35

अभिनेते वैभव मांगले यांचे आवाहन.

देवरुख- मधुगंधा कुलकर्णी व विवेक शितोळे निर्मित व प्रसिद्घ लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा मु. पो. बोंबिलवाडी हा धमाल विनोदी चित्रपट १ जानेवारी २०२५ रोजी सर्वत्र प्रसिद्घ होत आहे. हा चित्रपट रसिक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जावून पहावा असे आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केले आहे. चित्रपट प्रमोशनसाठी ते देवरुख येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी वैभव मांगले यांनी सांगितले की परेश मोकाशी यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलीझाबेथ एकादशी, वाळवी, नाच ग घुमा असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता मु. पो. बोंबीलवाडी या गाजलेल्या नाट्यकृतीवर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नाटकापेक्षा या चित्रपटात अनेक प्रसंग नव्याने पहायला मिळणार आहेत. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असुन सहा वर्षानंतर प्रशांत दामले हे या चित्रपटात हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रशांत दामले यांच्यासह आनंद इंगळे, वैभव मांगले, सुनिल अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, प्रणव रावराणे, गणेश मयेकर, मनमीत पेम, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाचे चित्रिकरण कुडाळ तेर्‍ये बांबर्डे व मुंबई येथे झाले आहे. हा निखळ करमणुक करणारा चित्रपट असुन वैभव मांगले यांची वरवंटे काका उर्फ व्ही सिताराम हि भूमिका आहे. अणुबाँम्बचे पेटंट मिळवण्यासाठी हिटलर जपानला जाणार असतो तो चुकुन बोंबिलवाडीत येतो. या वाडीत कलाकार नाटकाची तयारी करत असतात यामुळे हिटलर व चर्चिल यांची जी धमाल उडते ती पहाण्यासारखी आहे. रसिकांना हा चित्रपट निखळ करमणुकीचा आनंद देणारा ठरणार आहे असे वैभव मांगले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here