रत्नागिरी: देशातील पहिले पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर भागोजीशेठ कीर यांनी बांधले होते. याआधी भागोजीशेठ कीर यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी विविध देवळे, शाळा, गोशाळा, आश्रम, अन्नछत्र, वसतिगृहे, धर्मशाळा, विहिरी, पाणवठे आणि स्मशानभूमी उभारून मोठे कार्य केले आहे.
भागोजीशेठ कीर यांचा खरा इतिहास नष्ट करण्याचा शिक्षण विभागाने केलेला प्रयत्न दुर्दैवी असून, त्यांच्या कार्याचा योग्य गौरव होण्यासाठी आणि पूर्वीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या योगदानाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी हिंदू कटबु समाजाने केली आहे.
या मागणीसाठी निवेदन हिंदू कटबु समाजाच्या वतीने संघाचे मुख्य सल्लागार निवृत्त तहसीलदार श्री. राजेंद्र बिर्जे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अध्यक्ष बी. टी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात सचिव संजय खेत्री, महेश सासवे, अध्यक्ष राजीव कीर, सचिव चंद्रहास विलणकर, खजिनदार आर. के. विलणकर, उपाध्यक्षा सौ. तिवरेकर, विजय बिर्जे आणि दिलीप भाटकर आदी उपस्थित होते.
समाजाच्या या पाठिंब्यामुळे भागोजीशेठ कीर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.