रत्नागिरी: जिल्ह्यातील बेरोजगार, सुशिक्षित आणि गोरगरीब तरुणांना पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे मोफत मार्गदर्शन शिबिर ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हे शिबिर रत्नागिरीच्या एसटी स्टँडसमोर 309 अरिहंत मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात अभ्यासिका, ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे. राज्य सरकारकडून लवकरच पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याने इच्छुक उमेदवारांना लेखी आणि मैदानी परीक्षांसाठी आवश्यक प्रशिक्षण या शिबिरात दिले जाईल.
शिबिराचे मुख्य आकर्षण:
- अभ्यासिका व ग्रंथालय: परीक्षेची तयारी सुलभ होण्यासाठी मोफत सुविधा.
- मैदानी प्रशिक्षण: पोलीस भरतीतील शारीरिक चाचण्यांसाठी विशेष सराव सत्र.
- सराव परीक्षा: लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन व मॉक टेस्ट सुविधा.
नोंदणीसाठी संपर्क:
- मो. केदार चव्हाण: 7208612222
- श्री. मंदार नैकर: 8554853999
- सचिव केदार चव्हाण: 7755924392
नोंदणी प्रक्रियेचे मार्गदर्शन:
- व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक:
https://chat.whatsapp.com/GzOOOcjlCwdL9nx9dXltfo - ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म:
https://forms.gle/dSX1kUdUP7cZFCQe9
जिजाऊ संस्थेच्या सचिव श्री. केदार चव्हाण यांनी तरुणांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.