रत्नागिरी:- IEDSSA तर्फे आयोजित कॅरम स्पर्धेत रत्नागिरी गव्हर्नमेंट पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा कोल्हापूरमधील के. पी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पार पडली. राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे मुंबईत होणाऱ्या पुढील स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
आयुष सावंत, सर्वेश महाकाळ, सुजल चव्हाण, सर्वेश मोरगावकर, आणि सिद्धांत कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. टीमचे नेतृत्व सर्वेश महाकाळ यांनी केले, तर त्यांना समन्वयक सागर चंद्रकांत सुर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे आणि कॅरम टीमचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हृषिकेश विश्वनाथ सावंत
मुख्य संपादक, टाईम्स विश्वनाथ न्यूज