गोर-गरीब, शेतकरी, वंचित, अपंग रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार घेऊन संघटनेचे काम करणार असल्याचे केले प्रतिपादन!
राजापुर:- रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी कृषी राज्यमंत्री, विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांच्या विचारांशी प्रेरित होऊन सर्वसामान्य लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार लोकांना अडीअडचणींमध्ये आरावकर हे मदत करत असतात तसेच कोरोनाच्या काळात आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आणि त्यांचे स्वीय्य सहाय्यक आदिनाथ कपाळे यांच्या सहकार्यान शेकडो रुग्णांना सहकार्य केले होते. श्री. आरावकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत भजनीबुवा असून सामान्य माणसांच्या मनात त्यांचे एक वेगळे आदराचे स्थान आहे.
तसेच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अन्य अनेक आरोग्यविषयक योजनांचा दिला आहे. लाभ मिळवून आरावकर यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे तसेच त्यांना वैद्यकीय विभाग आघाडीचे प्रमुख म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून रयत क्रांती संघटना आपलं काम जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. श्री. आरावकर यांच्या नियुक्ती नंतर त्यांच्यावर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.