📍 देवरूख: प्रसिद्ध रांगोळी कलाकार विलास रहाटे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रांगोळी क्षेत्रातील योगदान आणि मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील उल्लेखनीय कार्य याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.
युवा महोत्सवातील योगदान
रहाटे गेल्या तीन वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या टीमला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाने आंतरविद्यापीठ, विभागीय, झोन आणि राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले आहे.
यामध्ये चित्रकला, क्ले मॉडेलिंग, पोस्टर मेकिंग आणि रांगोळी या कलांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जागतिक विक्रमाची नोंद
रहाटे यांनी सर्वात लहान रांगोळी काढण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत राजभवन, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते त्यांचा रोख पारितोषिक देऊन विशेष सत्कार करण्यात आला.