किल्ले रायगड, 12 जानेवारी 2025
राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वृषाली गोनबरे हिने रायगड सर करत पाचवा क्रमांक मिळवला आहे. रत्नागिरीतील रानपाट गावातील वृषालीने 1700 पायऱ्या चढत चित्तदरवाजा, महादरवाजा, हत्ती तलावाच्या डावीकडून होळीचा माळ असा स्पर्धेचा मार्ग पूर्ण केला.
जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या वृषालीने आपल्या अथक परिश्रमांमुळे हे यश मिळवले. तिच्या कामगिरीमुळे संस्थेचे नाव उजळले आहे.
वृषालीच्या या यशाबद्दल जिजाऊ संस्थेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.