रत्नागिरी:- शहरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी आहे. मोहसिन अब्दुलगनी शेख (37, ऱा बाजारपेठ रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े. शुक्रवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्याची 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिन हा विवाहीत असताना देखील पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखविल़े तसेच तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केल़े. दरम्यान मोहसिन हा विवाहीत असल्याचे समजताच आपली फसवणूक झाली असे पीडितेच्या लक्षात आल़े. त्यानुसार महिलेकडून शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होत़ी. पोलिसांनी याप्रकरणी मोहसिन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले आहे.