राजापूर/प्रतिनिधी दि.२१: शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उपनेते राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने दिनांक २३ जानेवारी रोजी राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये तसेच रत्नागिरी येथे सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना उपनेते तथा मा. आमदार राजन साळवी यांचावतीने दि. २३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९.३०वा. शिवसेना भवन, राजापूर येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रम व सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू समारंभ तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन
तसेच लांजा येथे सकाळी ११:०० वा. शिवसेना भवन, लांजा येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाला व महिला आश्रम, लांजा येथे भेटवस्तू वाटप व विविध उपक्रम
तसेच रत्नागिरी येथे श्री राजन साळवी संपर्क कार्यालय शिवसेना भवन, रत्नागिरी आठवडा बाजार येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा, हळदी कुंकू समारंभ व महाप्रसाद व रात्री ८:०० वा. – वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भजन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.