सर्पदंश झाल्याने रत्नागिरीतील खालगाव धाऊलवाडी येथील गणपत पाल्ये यांचे दुःखद निधन!

0
21

रत्नागिरी:- रत्नागिरी मधील खालगाव गावातील धारेखालील धाऊल वाडी,येथील गणपत पाल्ये वय 62 गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी राहत्या घराच्या बाजूला काम करत असताना त्यांच्या पायाला सर्पदंश झाला असता लगेच आजूबाजूच्या लोकांनी त्याना जाकादेवी प्रा.आरोग्य केंद्रात आणले तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने, नर्सेसनी प्राथमिक उपचार देऊन रत्नागिरी ला हलवण्यास सांगितले, त्यांनी लगेचच रत्नागिरी शासकीय जिल्हा रुग्णलयात आणले व उपचार सुरु केले पण त्याना ICU ची गरज होती. पण हॉस्पिटल मध्ये उपलब्ध नसल्यामुळे पुढे कोल्हापुर ला नेण्यास सांगीतले, त्यांनी लगेचच 108 रुग्णवाहिका मधून कोल्हापूर ला सिव्हील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असता उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी 11 च्या सुमारास निधन झाले.

दुर्दैव एवढंच रत्नागिरीत जिल्हा रुग्णालय असून पण इथे सुविधा रुग्णांना मिळत नाही.जर इथे ICU ची व्यवस्था या रुग्णाला मिळाली असती तर, त्या वेक्तीचा जीव वाचला असता.प्रत्येक वेळी मुंबई, कोल्हापूर ला नेण्यास सांगितले जाते, जर कोल्हापूर जिल्हात जिल्हा शासकीय रुग्णालय सर्व सुविधा उपलब्ध असतील ते मग रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात का नाही ?? हा संशोधनाच भाग आहे. प्रत्येक सामान्य माणसाला या व्यवस्थेला सामोरे जावे लागते. या अपुऱ्या सुविधेमुळे अजून किती लोकांचे बळी घ्यायचे आहेत.हा एक सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे, अशी व्यथा तेथील ग्रामस्थ असलेल्या सचिन गोताड यांनी मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here