रत्नागिरी: लांजा तालुक्यात सापुचेतळे-वाघ्रट रस्त्यावरील तरळवाडी येथे दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. गुरुवारी (ता. १६) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात घडला.
मृत व्यक्तीचे नाव गोपिनाथ महादेव मांडवकर (४८) असून, त्यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवत चुकीच्या बाजूने जाऊन दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. अपघातात संतोष गंगाराम पत्याणे (४०) आणि मांडवकर यांच्या मागे बसलेली सुभद्रा पाष्टे हे जखमी झाले.
पोलिस हेड कॉन्स्टेबल तेजस मोरे यांच्या तक्रारीनुसार लांजा पोलिस ठाण्यात मांडवकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.