रत्नागिरी जिल्ह्यातील सेतवडे येथील “शैक्षणिक व सामाजिक संस्था” ने दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा न्यू इंग्लिश स्कूल, सेतवडे येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. सज्जाद अक्रम सय्यद होते. यावेळी विविध मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NMMS परीक्षा, निबंध स्पर्धा, कलाकृती सादरीकरण, राज्यस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय सेवा कार्य यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिले गेले व अपयश न डगमगता प्रयत्न चालू ठेवण्याचा सल्ला अध्यक्षांनी दिला.