हैदराबाद | प्रतिनिधी
हैदराबादमधील सिगाची इंडस्ट्रीजच्या फार्मा युनिटमध्ये नुकतीच मोठी दुर्घटना घडली. Microcrystalline Cellulose (MCC) तयार करणाऱ्या या युनिटमध्ये झालेल्या अपघातात आतापर्यंत 36 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
MCC ही औषधनिर्मितीत वापरली जाणारी महत्वाची पदार्थ असून, ती फायबरयुक्त लाकडाच्या गरापासून तयार केली जाते. ही दुर्घटना औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.