रत्नागिरी:- जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने 52वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन 9 व 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी 11 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडेल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
गुरुवार, 9 जानेवारी
सकाळी 9 वाजता विज्ञान दिंडीचे आयोजन
सकाळी 11 ते 1 उद्घाटन समारंभ
दुपारी 1 ते 5 विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण व प्रदर्शन
प्रश्नमंजुषा आणि विज्ञान प्रतिकृती कार्यशाळा
शुक्रवार, 10 जानेवारी
सकाळी 11 ते 1 विज्ञान शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग
सायंकाळी 4 वाजता पारितोषिक वितरण समारंभ
सर्वांसाठी खुले प्रदर्शन
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृती व प्रकल्प सर्वांना पाहण्यासाठी खुले असतील. जिल्ह्यातील विज्ञान शिक्षणाला चालना देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे योगदान देणार आहे.