चुनाकोळवण (राजापूर):- राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण नं. 1 झेड.पी. प्राथमिक शाळेने 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिव्यांग विद्यार्थी उपकरण निर्मिती
दिव्यांग विद्यार्थी राज जगन्नाथ बाईत याने “आधुनिक फावडे” या उपकरणाच्या निर्मितीत द्वितीय क्रमांक पटकावला. मार्गदर्शनासाठी शिक्षक श्री. सहदेव दिनकर पालव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्राथमिक शिक्षक श्री. सहदेव दिनकर पालव यांना प्रथम क्रमांक
शिक्षक श्री. सहदेव दिनकर पालव यांनी शैक्षणिक साहित्य निर्मितीत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली आहे. ग.सा.वि. संकल्पना केंद्रातून साकारलेल्या त्यांच्या उपक्रमाने शिक्षण क्षेत्रात एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे.
सवतकडा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चुनाकोळवण गावातील शाळेने विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.