रत्नागिरीत हिंदु देखील राहतात याचा प्रशासनाला विसर!

0
38
Nitesh Rane speaks on illegal Majaar in Ratnagiri
आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी संवाद साधला.

शहरातील अनधिकृत मजार हटवण्यासंदर्भात आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत.

रत्नागिरी:- आमदार नितेश राणे काल दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी दौऱ्यावर (BJP MLA Nitesh Rane in Ratnagiri) आले होते. हिंदूतत्वाच्या संबंधित मुद्दे त्यांनी उचलले. रत्नागिरी रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ आहे. रत्नागिरीमध्ये लांगूलचालनचे विषय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अनधिकृत बांधकामं वाढली आहेत, ज्याला माजारीचे स्वरूप दिलेलं आहे. मोहम्मद पैगंबरच्या (Mohammad Paigambar) शिकवणीमध्ये मजारीला (Majaar) परवानगी आहे का? असा थेट प्रश्न त्यांनी मुस्लिम समाजाला (Muslims) विचारला. तसेच अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना (Illegal Construction) काढण्याकरिता कोणती अडचण येत असल्याचे म्हटले.

ते पुढे म्हणाले, ‘हिंदू समाजाने रत्नागिरीत कुठल्याही शासकीय जमिनीवर साधी टपरी बांधली तरी ती दोन तासांत हटविली जाते, प्रशासन जो नियम हिंदू समाजाला लावतं तोच नियम मुस्लिम समाजाला लावला पाहिजे.’ रत्नागिरीत शरीया कायदा लागू झाला आहे का? असा थेट प्रश्न त्यांनी पोलिस प्रशासनाला उद्देशून केला. हिंदुत्वाशी (Hinduttva) निगडीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालय आवारात असलेले मजारीच्या स्वरूपातील अनधिकृत बांधकाम काढलं गेलं नाही आणि रत्नागिरीतील हिंदू समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झाला, कायदा – सुव्यवस्था बिघडली तर त्याला पूर्ण जबाबदार इथलं प्रशासन राहील तसेच इथे गोमांस विकणारे, कत्तलखाने चालवणारे आहेत त्यांची नावं एसपी आणि प्रशासनाकडे दिली आहेत, त्यावर कारवाई होते का त्याकडे आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने जर यापुढे आम्हाला परत परत याच पद्धतीची उत्तरं दिली, तर असे हिंदू समाजाला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचं सरकार किती काळ त्या खुर्चीवर ठेवतं हे आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्याबद्दल निर्णय घेऊ व पोलीस प्रशासनातही काही सडके आंबे आहेत ते या लोकांना मदत करताहेत व अशा सडक्या आंब्यांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आम्ही खराब होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here