लोकसेवेचे व्रत घेतलेले ‘डॅशिंग’ युवा नेते संतोष आरावकर!

0
110
Santosh Arawkar, Rajapur Tulsawde, a social worker in Konkan, Maharashtra.
सुप्रसिद्ध भजनी बुवा व रत्नागिरी जिल्हा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष आरावकर.

जनसेवेसाठी तत्पर संतोष आरावकर! लेखन :- हृषिकेश विश्वनाथ सावंत देसाई

आज मी संतोष आरावकर यांच्याबद्दल लिहिणार आहे. संतोष आरावकर, राहणार तुळसवडे , ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी. नुकतीच त्यांची माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार श्री सदाभाऊ खोत यांच्याकडून रत्नागिरी रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली. ही नियुक्ती करण्यामागे सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक श्री. आदिनाथभाऊ कपाळे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच मार्गदर्शन व सहकार्याने आरावकर हे राजापूर व एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची कामे करत असतात.

संतोष आरावकर हे गेली अनेक वर्षे आरोग्य व सामाजिक सेवेच्या क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये प्रभावी योगदान द्यायचे असे मनाशी ठाम केलेले आहे. त्यांना अनेक वर्षे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्रासलेले रुग्ण पाहून त्रास होत असे, त्यानंतर त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की या रुग्णांचा त्रास कसा कमी करता येईल यासाठी आपण कार्यरत व्हायचे. ते व्यक्तिगत पातळीवर अनेक रुग्णांची मदत करतात, त्यांना रत्नागिरी सिविल हॉस्पिटल मध्ये काही प्रशासकीय अडचणी येत असतील तर त्याची सोडवणूक करतात, रात्री अपरात्री कोणी पेशंट ऍडमिट झाला मग तो त्यांच्या गावातला असू दे किंवा शहरातला असू दे, त्यांच्या ओळखीचा असू दे किंवा अनोळखी असू दे, ते रात्री धावून जाणारच आणि त्यांची जी काही समस्या असेल व काही मदत असेल तर ते करतातच.

तसेच शासकीय कार्यालयात कोणाचे काही काम अडले असेल, शासकीय योजनेचे काम असेल तर ते देखील ते पूर्ण करून देतात. संपूर्ण निस्वार्थी भावनेने ते ही जनसेवेची कार्य करत असतात. कोविड काळामध्ये त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली, व्यक्तिगत पातळीवर आर्थिक मदत केली तसेच आदिनाथ भाऊ कपाळे यांच्या मार्फत व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांनी अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले. या सर्व जनसेवेच्या कार्यात आदिनाथ कपाळे जे देखील तुळसवड्याचे सुपुत्र आहेत, त्यांचा कायमच पाठिंबा व प्रोत्साहन आरावकर यांना लाभत आले आहे. संतोष आरावकर जी जनतेची कामं करत असतात त्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळावा किंवा कोणाही कडून काही फायदा मिळावा असा त्यांचा हेतू कधीच नसतो, त्यांची ही विशेषता आजच्या सामाजिक – राजकीय क्षेत्रात एक अतुलनीय बाब म्हणून ओळखली जात आहे.

आज संतोष आरावकर यांच्यासारखी खूप कमी माणसं राहिलेली आहेत जी निस्वार्थी मनाने लोकांची काम करून देतात आणि त्या पाठीमागे कोणताही छुपा हेतू ठेवत नाहीत. ही विलक्षणीय बाब आहे. अनेक लोकांना नोकरी लावणं असो विद्यार्थी – युवक, महिला, युवती, विद्यार्थिनी, आबाल वृद्ध, वंचित, कष्टकरी, कामगार, कर्मचारी, अपंग व्यक्ती असो किंवा दिव्यांग, ग्रामीण भागातून येणारे कमी शिकलेली लोक असो त्यांच्यासाठी धावून जाणारे ते देखील निस्वार्थी मनाने धावून जाणारी अशी जर कोणी लोक असतील तर त्यामध्ये संतोष आरावकर यांचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव घेतले जाते असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.

संतोष आरावकर यांच्या सामाजिक जीवनाची जी सुरुवात झाली ती म्हणजे भजनी बुवा या भूमिकेतून. ते सतत सांगत असतात की भजनी बुवा हे जे माध्यम माझ्याकडे नसतं तर आज मी एवढ्या ओळखी, एवढ्या लोकांची कामे करू शकलो नसतो. तसेच आयुष्यात आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मी उभा राहू शकलो नसतो. भजनी बुवा या त्यांच्या माध्यनाबद्दल ते सतत कृतज्ञता व्यक्त करत असतात. भजनी बुवा या नात्याने लोकांना चांगले उपदेश देणं, त्यांचे जीवन सुधारणं, एखादा वाईट मार्गाला लागला असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणणं अशी परोकाराची कामं ते करत असतात.

भजनी बुवा हे प्रभावी आणि आदराचे स्थान आहे. संतोष आरावकर यांना भजनी बुवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक विशेष सन्मान आहे. संपूर्ण कोकणात त्यांना विशेष आदराने उल्लेख केला जातो. आज कोकणातील जर तीन किंवा पाच उत्कृष्ट भजनी बुवा आपण जर बाजूला काढले तर त्यामध्ये नक्कीच संतोषराव यांचे नाव पहिल्या तीन/ पाचात घेतले जाते. त्यांचे भजनेबुवा म्हणून काम असे आहे की त्यांनी कधी कोणाचा चिटवळगिरीने अपमान किंवा उल्लेख केलेला नाही जो की आजचे अनेक भजनी बुवा करत असतात.

आपल्या वयापेक्षा मोठे असलेले भजनी बुवा जे सीनियर आहेत त्यांचा देखील त्या कार्यक्रमांमधून अनेक भजनी बुवांकडून अपमान केला जातो पण संतोषजींनी हे कायमच राखले आहे की समोरच्या बुवांचा अपमान होणार नाही याची ते काळजी सतत घेत असतात आणि कायम समोरच्याबद्दल आदराचा भाव ते ठेवत असतात. ज्येष्ठ भजनी बुवांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदर असतो. त्यांचे वडील व आजोबा हे देखील भजनी बुवा होते आणि त्यांना देखील समाजात विशेष मान होता आणि आज देखील आहे. ही परंपरागत त्यांच्यावर आलेली जबाबदारी म्हणा ते उत्कृष्टपणे ती पार पाडत असतात. कुठलेही गालबोट आपल्या ‘भजनी बुवा’ या आदराच्या व्यवसायाला व आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना लागणार नाही याची ते सतत काळजी घेताना दिसतात.

आदिनाथ कपाळे जी हे खरे तर आरावकर यांचे वर्गमित्र आहेत. ही दोघांची जोड गोळी भविष्यात राजापूर – लांजा – साखरपा व एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठा प्रभाव पाडणारी ठरणार आहे. या जोडगोळीचा राजापूर तालुक्यात विशेष प्रभाव आहे.

आज असे पायच दुर्दैवाने खूप कमी आहेत ज्यांचे आपण चरण वंदन करू शकू. सुदैवाने संतोष जी हे त्यामधील एक आहेत. संतोषजी यांनी आजपर्यंतचे संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे, नैतिकतेने व्यतीत केले आहे. जणू, आदर्शपणाचे ते मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहून अनेकांनी बोध घ्यायला पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे, युवा वर्गाने तर तर नक्कीच! त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here