‘आठल्ये-सप्रे- पित्रे’ला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील ‘फाईन आर्ट’मध्ये दोन पारितोषिके!

0
79

देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुखच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५७व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत रांगोळी व मेहंदी डिजाइन या दोन फाईन आर्ट प्रकारात पारितोषिके प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.

रांगोळी या कलाप्रकारात सायली संतोष शिवगण(तृतीय वर्ष, संगणक विज्ञान) हिने स्पर्धेत प्रथमच सहभागी होऊन ‘पारंपारिक भौमितिक रांगोळी’ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले, तर सिद्धी लवू शिंदे(प्रथम वर्ष, कला) हिने वैष्णवी वैभव सुर्वे(तृतीय वर्ष, विज्ञान) हीच्या हातावर ‘वधू मेहंदी’ रेखाटून कॉन्सोलेशन पारितोषिक प्राप्त केले. या दोन्ही स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून विलास रहाटे व प्रा. प्रज्ञा शिंदे यांचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाच्या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे व प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे, तसेच सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here