कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाजपाच्या वतीने करण्यात आले आव्हान.
रत्नागिरी:- महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ ग्रहण कार्यक्रम रत्नागिरी मध्ये थेट प्रक्षेपण करून जल्लोष साजरा केला जाणार आहे. सदरहू कार्यक्रम रत्नागिरी उत्तर मंडल, रत्नागिरी दक्षिण मंडल व रत्नागिरी शहर मंडल या तीनही मंडलाचा मिळून एकत्रित असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय येथे संपन्न होणार आहे .रत्नागिरी तालुक्याचा म्हणून असा हा एकत्रित कार्यक्रम जिल्हा कार्यालय येथे संपन्न होणार असून. सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व मंडल पदाधिकारी व सर्व माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्वकार्यकर्ते व नागरिक यांनी या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा कार्यालय येथे सायंकाळी 5 :00 वाजता उपस्थित रहावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, तालुका अध्यक्ष दादा दळी, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिलामोर्चा शहराध्यक्ष पल्लवी पाटील, युवामोर्चा शहराध्यक्ष सिद्धाय मयेकर, संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहा अशी विनंती भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने करण्यात आली आहे.