एस.टी. महामंडळाने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे :- भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे.

0
17

रत्नागिरी:- दीड वर्षांपूर्वी विभाग नियंत्रक, रत्नागिरी श्री. प्रज्ञेश बोरसे यांना महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस मधील गंभीर त्रुटींबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे यांनी पत्र दिले होते. परंतु विभाग नियंत्रक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

या कारणास्तव भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अजित ताम्हणकर यांना भेटून जवळ जवळ सर्व बसेस मधे आग विझवण्याचे संयंत्र नाही किंवा कालबाह्य असल्याबाबत कारवाई करण्याचे पत्र दिले व चर्चा केली. ३ प्रवासी असणाऱ्या रिक्षा मध्ये जर संयंत्र नसेल तर त्वरित कारवाई होते, मग बसेस वर का नाही ही बाब श्री. नलावडे यांनी निदर्शनास आणली. यानंतर सहा. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेस वर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले. या वेळी भाजपा पदाधिकारी श्री. प्रशांत सनगरे देखील उपस्थित होते.

प्रवाशांनी देखील सदर बाब प्रवास करताना निदर्शनास आल्यास त्याची तात्काळ तक्रार करावी, असे श्री. नलावडे यांनी सूचित केले. पत्राची दखल त्वरित घेतल्याबद्दल भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अजित ताम्हणकर यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here