लांजा:- संस्थापक-श्री निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र , श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 5 वा.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी – केंद्र लांजा ) या ठिकाणी शिबीर घेण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पहिल्यांदा मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळाला.
विविध गावातील,वाडी,आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात तरुण, तरुणी, पुरुष, स्त्रिया लहान मुले, व वयस्कर लोकांनी गर्दी केली शिबिराचा जास्त जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेतला 480 ते 540 लोकांनी नोंद करून लाभ घेतला. व 400 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू, मुतखडा, मूळव्याध, हर्निया, अपेंडीस,हायड्रोसील,वेगवेगळ्या आजारांवती तसेच नेत्र तपासणी,शुगर तपासणी,रक्तदाब,जनरल तपासणी, या मोफत तपासण्या करून मोफत गोळ्या औषधे,व नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात आले.ज्या रुग्णांची ऑपरेशनची गरज आहे त्यांनाही संस्थेच्या हॉस्पिटल मधून मोफत ऑपरेशन करून देणार आहेत.
या शिबिरासाठी मुंबई,ठाणे,झडपोली येथून तज्ञ डॉक्टर विजय पगारे, व नर्सेस यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिली. उपस्थित मान्यवर श्री निळकंठ बगळे सर- लांजा पोलीस निरीक्षक, शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष- अँड महेंद्र वसंत मांडवकर, संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण सर, लांजा तालुका अध्यक्ष- योगेश पांचाळ ,रत्नागिरी तालुकाध्यक्ष मंदार नैकर,श्री चंद्रकांत परवडे -कुणबी पतसंस्था अध्यक्ष, श्री विलास दरडे- कुणबी पतसंस्था उपाध्यक्ष, रमाकांत सावंत -मा. मुख्याध्यापक लांजा कॉलेज, श्री विवेक नाईक- तालुका आरोग्य कार्यालय अधिकारी ,श्री प्रकाश गुरव- लांजा तालुका संघ व्यवस्थापक श्री ओमकार गांगण- शासकीय वकील, श्री महादेव खानविलकर- खरेदी विक्री संघ चेअरमन, श्री सुहास साखरकर -रुण गावचे सरपंच, श्री प्रथमेश बोडेकर युवक- काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष व वैदही मॅडम -लांजा व्यावसायिक, श्री गुरुप्रसाद देसाई साहेब- तालुका प्रमुख शिंदे- गट, सचिन लिंगायत तसेच, जिजाऊ सदस्य सचिन गोताड,साहिल रेवाळे, व सर्व सहकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलंन करून महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभून कार्यक्रम संपन्न झाला.