दापोली:- ५ डिसेंबर, २०२४ रोजी ए. जी. हायस्कूल दापोली येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. ११ वी क्रॉप च्या विद्यार्थ्यांना कोंकण कृषि विद्यापीठातील मृदा शास्त्र विभागातील डॉ. खोब्रागडे आणि डॉ. देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मृदा दिनाची माहिती तसेच कृषि क्षेत्रातील संधी ह्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एस. एम. कांबळे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. मुंडेकर सर यांनी डॉ. खोब्रागडे आणि डॉ. देशमुख यांचे स्वागत केले. तसेच श्री. गरंडे सर यांनी कार्यक्रमची सांगता आभाराने केली.