चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मापारी मोहल्ला उर्दू शाळेचे कार्यकुशल, सेवाभावी शिक्षक एजाज इब्जी यांना शिक्षण विभागातील अधिकारी , शिक्षक आणि ग्रामस्थां कडून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भावपूर्ण आदरपूर्वक निरोप देण्यात आला.
एजाज इब्जी हे शिक्षक आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची छाप सोडली आहे. अशा ह्या शिक्षकास सेवानिवृत्ती निमित्त चिपळूण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रीय प्रमुख तसेच ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सन्मान करुन अत्यंत आदराने सन्मान चिन्ह देऊन त्यांना भविष्यात सुखी समृद्ध जीवनासाठी इश्वर चरणी प्रार्थना करुन भरघोस शुभेच्छा दिल्या.
अनेक शिक्षकांनी त्यांच्या कला गुणांची, त्यांच्या कार्यकुशलतेची, त्यांच्या वक्तशीरपणे बाबत, विद्यार्थी प्रेम तसेच ग्रामस्थां बरोबर वागणूकी बाबत आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे अनेक गुण आपल्या जीवनात ही आल्यास आपल्या समस्या ही चुटकीसरशी सोडविल्या जातील. अशी अनेक शिक्षकांनी त्यांच्या जीवना बद्दल माहिती दिली.
एजाज इब्जी यांनी ३२ वर्षे सेवेत सुरुवातीला २ वर्षे राजापूर तालुक्यात सेवा केली आणि उर्वरित ३० वर्षे चिपळूण तालुक्यात सेवा बजावली. मागील १५ वर्षांपासून दिव्यांग असून ही त्यांनी उत्तम रित्या आपले कार्य बजावले आहे. ते अत्यंत अभ्यासू शिक्षक असल्याने आपल्या अनेक मित्रांना ही समजपूर्वक मार्गदर्शन करीत होते.
या वेळी पंचायत समिती चिपळूण चे गटशिक्षणाधिकारी इरनाक, विस्तार अधिकारी सशाली मोहिते , विस्तार अधिकारी आस्माँकौसर देसाई, केंद्रीय प्रमुख अशफाक पाते, मुश्ताक अष्टीकर, माजी विस्तार अधिकारी नसरीन खडस , चिपळूण शिक्षण सल्लागार समिती सदस्य लायन्स क्लब सावर्डे अध्यक्ष सतीश सावर्डेकर, लायन अरविंद भंडारी, रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक साधन गट माजी सदस्या रिझवाना इब्जी तसेच चिपळूण तालुक्यातील सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ , आजी माजी विद्यार्थी, नातेवाईक तसेच अनेक मित्रमंडळी उपस्थित राहून सर्वांनी इब्जी गुरुजींना भरघोस शुभेच्छा दिल्या.