
राजकारण पुन्हा तापले!
मुंबई:- माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढ झाली असून सीबीआयकडून (CBI) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (MVA Government) असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती. त्यावेळी, त्यांनी थेट अनिल देशमुख यांचे नाव घेत, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवल आहे, याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता, गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) आभार मानले आहेत. तसेच,राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केलं जातंय, असेही त्यांनी म्हटलं.