थोर समाजसुधारक, माजी आमदार कै. श्री. आप्पासाहेब गोगटे यांच्या नावाने ओळखली जाणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड.

0
51

देवगड:- श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग अंतर्गंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेचे नामांतरण करण्यात आले असून थोर समाजसुधारक मा. श्री. आप्पासाहेब गोगटे यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेला देण्यात आले आहे.

आप्पासाहेब गोगटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड जि. सिंधुदूर्ग या संस्थेच्या नामांतरणाचे उद्घाटन दि. ११ . १०. २०२४ रोजी देवगड – कणकवली मतदार संघाचे आमदार श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, देवगड-जामसंडे नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा श्रीम. साक्षी प्रभू, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज प्रभू, प्राचार्य, श्री. एस. एल. कुसगांवकर व संस्थेचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here