रत्नागिरी:- मागील महिन्यात आयोजित केलेल्या समझोता दिवसाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी यांच्यातर्फे सर्व शाखांत आणि विभागीय कार्यालयात निष्क्रिय (NPA) कर्ज खातेदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेअंतर्गत त्यांची निष्क्रिय (NPA) कर्जखाती भागवण्याकरिता १६ ते २१ पर्यंत समझोता दिवसाचे आयोजन केले आहे. हा दिवस विशेषतः अशा एनपीए कर्जदारांसाठी आहे जे कर्जदार वैद्यकीय परिस्थितीमुळे, इतर परिस्थितीजन्य कारणांमुळे कर्जाची परतफेड वेळेत करू शकले नाहीत व त्यामुळे सदर खाती एनपीएत आहेत अशांसाठी ही संधी आहे. या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.