लांजा:- मिशन आपुलकी अंतर्गत, जि. प. आदर्श शाळा भडे नं १ कडे मागील काही महिने दात्यांचा ओघ वाढला आहे. शाळेचे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे, कला, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. व या चढत्या आलेखाकडे पाहुन गावातील व गावाबाहेरच्या दात्यांचा शाळेकडे ओढा वाढला आहे. गावातील प्रतिष्ठीत शेतकरी व आंबाबागायतदार श्री. रामदास पाटील, यांनी एक फँन व श्री. धनंजय बच्चे पाटील (पारकर शोरूम रत्नागिरी चे मालक) यांनी दोन फँन शाळेला देणगी स्वरुपात दिले, आहेत.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुड सर यांनी दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना, आलेख नेहमी चढता राहिल याची हमी दिली. या कामासाठी विशेष मेहनत ,श्री प्रविणशेठ तेंडुलकर यांनी घेतली त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले प्रसंगी मा. श्री. रामदास पाटील, मा. श्री. प्रविण तेंडुलकर, मुख्याध्यापक श्री. कुड सर, व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री. राऊत साहेब, श्री. माने सर, दळी मँडम, श्री खुटाळे सर, उपस्थित होते. शेवटी दोन्ही दात्यांचे मनापासून आभार विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केले.