झाडे लावा झाडे जगवा,नदी स्वच्छ ठेवा, प्लास्टिक वापरु नका असा संदेश.
देवरुख:- भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत विविध संदेश समाजाला देत विशाल निरंकारी हे अलीगड ते कन्याकुमारी असा भारतभ्रमण दौरा करत आहेत. या दौर्यात ते देवरुखला आले असता देवरुखवासियांशी त्यांनी संवाद साधला व याञे विषयी भावना व्यक्त केल्या. आपण खिशात एकही रुपया न घेता भारत भ्रमण याञेसाठी बाहेर पडलो आहे. समाजात चांगली माणसे आहेत,परोपकारी आहेत ती मला मदत करत आहेत. त्या त्या गावात जाण्यासाठी मी वाहनचालकांकडे लिफ्ट मागतो,मंदिरात रहातो असा प्रवास महिनाभर करत आपण कोल्हापूरातुन देवरुखला पोहचलो असे विशाल यांनी सांगितले. रत्नागिरी करुन पुढे गोव्याला जाणार असे ते म्हणाले.
झाडे लावा, झाडे जगवा, पाणी शुद्घ ठेवा, नद्या वाचवा,प्लास्टिकचा वापर करु नका, आपला निसर्ग आपण जपा असा संदेश देणारी ही भारत भ्रमण याञा आहे. भाषा प्रांत वेगळा असला तरी भारतातील माणसे हि सकारात्मक विचार करणारी आहेत. भारतीय संस्कृती महान आहे असे विशाल यांनी सांगितले. आपण साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करणार आहे असे त्यांनी सांगितले. देवरुख येथे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते व प्रशांत काबदुले यांनी या भेटीचे नियोजन केले होते. यावेळी संत निरंकारी सेवा मंडळाचे दादा केसरकर, सुरेंद्र माने,रंजना कदम, बंधु कोळवणकर, स्वरा काबदुले,दिपा प्रभावळकर,वैभव कदम,अयुब कापडी संदिप गुढेकर आदि उपस्थित होते.
आपण दिड हजार झाडे लावून एक प्लांट बनवला असून ती सर्व झाडे दत्तक घेवून त्याचे संवर्धन करणार असल्याचे सांगत देवरुख परिसरात आल्यावर आपलं देवरुख-स्वच्छ सुंदर देवरुखचे फलक पाहून समाधान वाटले असे विशाल निरंकारी यांनी सांगितले. उपस्थितांनी मनोगतातून विशाल यांना शुभेच्छा दिल्या. भारतील क्रीकेटसंघातील रिंकु सिंग यांचे विशाल हे लहान भाऊ आहेत.