रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने उद्या गुरूवार दि.१९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सिव्हील हाॅस्पीटल ब्लड बँक रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ,सर्व मोर्चा ,आघाड्या यांचे पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे व रक्तदान करावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.