चिपळूण:- भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने चिपळूण येथील ७० वर्षीय शरदचंद्र भार्गवराम शेरे यांना धडक दिल्याची घटना रविवारी शहरातील पॉवर हाऊस येथे घडली. यामध्ये शेरे यांना दुखापत झाली. या प्रकरणी दुचाकीस्वारावर रविवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक दुर्गोळी (अडरे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद समिधा चेतन शेरे (चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिधा शेरे यांचे सासरे शरदचंद्र शेरे हे पाग पॉवरहाऊस नाका येथे रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वार अभिषेक दुर्गोळी याने दुचाकी भरधाव वेगात चालवून शेरे यांना धडक दिली. यात ते जखमी झाले. या अपघाताप्रकरणी दुचाकीस्वार दुर्गोळी. याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.