महाविकास आघाडी विरोधातील घोषणांनी चिपळूण शहर परिसर दणाणला!
चिपळूण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबत राजकारण करून राज्यातील महाविकास आघाडी आंदोलने करीत आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनांचा निषेध करण्याकरिता आज रत्नागिरी जिल्हा भाजयुमोच्या वतीने चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ प्रति आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दक्षिण ऋषिकेश केळकर, उपाध्यक्ष अभिषेक शिंदे, सरचिटणीस स्वप्नील गोठणकर, उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर. चिपळूण तालुकाध्यक्ष समीर पवार. गुहागर चे संगम मोरे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा युवा मोर्चा संयोजक अविनाश गुरव,युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस मंदार कदम, युवा मोर्चा कार्यकर्ते,वेद सुर्वे,अंकुश चौधरी, साहिल भिसे,राज खंडझोडे, यश खंडजोडे, शहरमंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, उपाध्यक्ष महेश कांबळी,सरचिटणीस सारिका भावे, चिटणीस प्रणाली सावर्डेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा शीतल रानडे, प्रसिद्धी प्रमुख अमृता जोशी, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अमित चिपळूणकर, सरचिटणीस अभिजित सावर्डेकर, महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस श्रद्धा कदम, बेटी बचाव बेटी पढाव शहराध्यक्षा साधना कात्रे, अभय चितळे, सुनील जांभेकर, निखिल किल्लेकर, आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.