गुहागर:- दि. 2 डिसेंबर 2024 रोजी देव दिवाळी निमित्ताने तवसाळ गाव पंचक्रोशीचे मंदिर, जागृत देवस्थान श्री महामाई सोनसाखळी मंदिर ट्रस्ट यांच्या संयोगाने मंदिर सजावट करण्यात आली होती. देव दिपावली उत्सव – जागर सोहळा संपन्न झाला. आपल्या ग्राम दैवत मंदिरात देवांना वस्त्र परिधान करतात त्याला (रुपा) असे संबोधले जाते. देवांना अलंकार चढविले होते. मंदिराला रंग रंगोटी करून,आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. साऊंड सिस्टिम चा सुमधुर संगीताने मंदिर परिसर मंगलमय वातावरणात झाले होते. रात्री गावातील पंचक्रोशी मधील भजनी मंडळ यांना निमंत्रित करण्यात आले होते.श्री महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई देवाचं गुणगान !! पाहुन तुझे रूप !! होऊ भजनात दंग !! जयघोष करीत उत्सव साजरा करण्यात आला.
तरी दर्शनासाठी ईतर गावातील रत्नागिरी जिल्हा, मुंबई, पुणे, गुहागर तालुक्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण होऊदे अशी साद घातली.तवसाळ गाव मंदिराचे बांधकाम (जिर्णोद्वार) शेवटच्या टप्प्यात असून सुंदर रंग रंगोटी करून मंदिराचे घुमट आकर्षक रंगाने रूपडं पालटलं आहे ,तसेच मंदिरातील गाभारा देवांची बैठक आरास, मनमोक साजेस आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. तरी येणाऱ्या ‘भाविकांनी सढळ हस्ते आपण आर्थिक (दान) मदतही करू शकतात. सर्व येणा-या दर्शनासाठी भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. शुक्रवार दि. 6 डिसेंबर दुपारी देव दिवाळी सप्ताह संपन्न झाला. देवांचा रुपा उतरविला आला उपस्थित तवसाळ गाव पंचक्रोशीतील चतुरशीमा ग्रामस्थ मंडळी देवीचे मानकरी सह मंदिराचे पुजारी गुरव बंधू श्री महामाई सोनसाखळी मंदिर ट्रस्ट – तवसाळ सर्वांचे आभार मानले.