देव -घैसास -कीर वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत संविधान दिन उत्साहात साजरा.

0
28

देवरुख:- भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. मंदार बेटकर यांनी केले. संविधानाचे महत्व तसेच संविधान मानवी जीवनात किती आवश्यक आहे तसेच संविधानातील कलमे तिची चौकट तिचा गाभा विद्यार्थ्यांनसमोर मांडला.

कार्यक्रमात संविधानाचे सामूहिक प्रस्ताविक वाचन करण्यात आले. PPT द्वारे संविधानाची निर्मितील छायाचित्रे तसेच त्यातील तत्वे संविधानाची पार्श्वभूमी बेटकर यांनी विद्यार्थ्यां समोर सादर केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुरा पाटील तसेच उप प्राचार्य वसुंधरा जाधव, कला शाखा प्रमुख ऋतुजा भोवड उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार बेटकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रद्धा महाराणा ( द्वितीय वर्ष कला) हीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here