चिपळूण:- उत्कर्ष मंडळ धामणवणे, आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी धामणवणे दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ६ वा. विणापूजन, सकाळी ६.१५ वा. दत्तांची आरती, सकाळी ८ वा. पंचामृत पूजा, सकाळी ९.३० वा. नवग्रह शांती होम, सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६.१० वा. श्रींचा जन्मकाळ, सायंकाळी ७ वा. सार्वजनिक हरिपाठ, रात्री ८ वा. महाप्रसाद, रात्री. ९.३० वा. कीर्तन, रात्री ११.३० वा. करमणूक कार्यक्रम होणार असून त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. रविवार दि. १५ रोजी पहाटे हरिजागर व काकडा आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.