रत्नागिरी:- रत्नागिरी येथील माजी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. संभाजी शिवाजी खराट (६०) यांचे बुधवारी सीबीडी बेलापूर येथील नाणेश हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
डॉ. संभाजी खराट हे दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथून विभागीय उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते त्यांनी मंत्रालय कोकण भवन येथे सहाय्य संचालक पदावर काम केल्यानंतर रत्नागिरी येथे तीन वर्षे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर उत्तम प्रसिद्धी आणि लोकाभिमुख जनसंपर्क अधिकारी म्हणून लौकिक संपादन केला होता त्यानंतर ते ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते तेथून पदोन्नतीवर ते कोल्हापूरला विभागीय उपसंचालक म्हणून तीन वर्षे कार्यरत होते.