रत्नागिरी:- जळगाव जिल्हा तायक्यांदो असोसिएशन तथा तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 21 ते 23 नोव्हेबर 2024 रोजी 34 व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धत व 10 वी पुमसे स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल बॅटमिटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धत क्योरीगी व पुमसे मध्ये रत्नागिरी जिल्हाने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धत 14 मुले व 14 मुली सुवर्ण पदक विजेत्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.अर्थव मुरुकुटे याची 50 किलो वरील वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
28 नोव्हेंबर ते 01 डिंसेबर 2024 रोजी होणाऱ्या ताऊ देवी लाल स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे 38 वी राष्ट्रीय अंजिक्यपद तायक्वॉडो सब-ज्युनियर स्पर्धत होणाऱ्य आहे. या स्पर्धसाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी अर्थव रवाना होणार आहे. अर्थवला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच , महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे क्रिडाशिक्षक सौ.सपना साप्ते, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिदें यांनी अर्थवला शुभेच्छा दिल्या, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर ,जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लब चे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन किर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.