देवगड:- समाजातील काही विकृत मनस्थितीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. अनेक शहरी आणि ग्रामिण भागांत महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आणि हिंसाचार यांच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा/महाविद्यालय शिकणा-या मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
शाळा/महाविद्यालय हे ज्ञान आणि कौशल्य विकासाचे प्राथमिक केंद्र आहे, जिथे मुलींना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर जीवनावश्यक कौशल्येही शिकवली जावीत. आत्मसंरक्षण कौशल्ये शिकल्याने मुली स्वत:चे रक्षण करू शकतात आणि धोकादायक परिस्थितींना तोंड देऊ शकतात. या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, शारीरिक व मानसिक बळ वाढते आणि समाजात मोकळेपणाने वावरण्याची क्षमता येते. यासाठी राज्याती सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणा-या महिला प्रशिक्षणार्थींच्या सुरशितेसाठी हर घर दुर्गा अभियान- २०२४ दि. ३०.०९ .२०२४ रोजी राबविणेबाबत आवाहन करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आयटीआय देवगड येथे दि. ३०.०९ .२०२४ रोजी प्रशिक्षीका श्रीम. शेवंता नाईक (ब्लॅक बेल्ट), राष्ट्रीय पंच यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्रशिक्षणार्थी व महिला कर्मचारी यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.