रत्नागिरीतील हिंदु-मुस्लिम ऐक्य अबाधित राहो!

0
61
Hindu Muslim Unity.
प्रातिनिधिक छायाचित्र.

लेखन:- कलपेश जाधव, रत्नागिरी

रत्नागिरीत गणेशोत्सव सुरू झाला. मिरवणुका निघाल्या. शहरातील लाला कॉम्प्लेक्स नजीक मी उभा राहून कर्ले – आंबेशेत च्या घरगुती गणपतींची सामूहिक मिरवणूक गेली अनेक वर्षे निघते ती पाहत उभा होतो. लाला कॉम्प्लेक्स हा भाग मुस्लिम बहुल आहे. सध्या देशातील हिंदु-मुस्लिम यांच्यामधील वातावरण बघता अशी कायम भिती मनात असते की असे गढूळ वातावरण आपल्या रत्नागिरी मध्ये तर निर्माण होणार नाही ना? आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिति देखील देशभरातील हिंदु-मुस्लिम संबंधांच्या दृष्टिक्षेपात पाहत असतो.

पण मला तर तेथे भलतेच वातावरण दिसले, ते म्हणजे एका ठिकाणी एक मुस्लिम महिला तीही बुरखाधारी आपल्या मुलाला कमरेवर घेऊन उभी होती आणि आपल्या लहान मुलीला ती गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती दाखवत होती. पाऊस होता म्हणून ती एका टपरीच्या आडोशाला उभी होती, पण तरीही त्या दोघी गणेश आगमनाची मिरवणूक मनापासून पाहत होत्या. गणेशाच्या आगमनाच्या गाण्यांचा देखील ते आनंद लुटत होत्या. नंतर पाहतो तर तिचे पती देखील दुसऱ्या बाजूला उभे होते आणि ते देखील मनापासून मिरवणूक पाहत होते.

नंतर ते नवरा-बायको एकत्र उभे राहून ती मिरवणूक पाहत होते. तिचे पती तर मिरवणुकीतील काही लोकांसोबत हस्तांदोलन देखील करत होते. लाला कॉम्प्लेक्सच्या गलरींमध्ये महिला-मुलं देखील मिरवणूक पाहत होते तर कोण व्हिडिओ शूटिंग करत होते, एक महिला तर व्हिडिओ कॉल करत ती मिरवणूक कोणालातरी दाखवत होती. अजून काही मुस्लिम महिला ही मिरवणूक पाहत होत्या. एकंदरीत हे पाहून मला खूप आनंद झाला. या आधी दहीहंडीच्या वेळी देखील अनेक मुस्लिम पुरुष – महिला, लहान मुलं – मुली आठवडा बाजार येथे गोविंदांना दहीहंडी फोडताना खूप आनंदाने पाहताना मी बघितले. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की रत्नागिरीतील व या देशातील हिंदु-मुस्लिम एकता अबाधित राहो. गणपती बाप्पा मोरया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here