रत्नागिरी:- भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा रत्नागिरी आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने “विमा सखी” या महिला विमा सल्लागार भरती मोहिमेचे आयोजन जिजाऊ संस्थेच्या हॉलमध्ये करण्यात आले. याप्रसंगी अनेक महिला आणि युवती कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात शुभांगी मालवणकर आणि सुदर्शन पाटील यांनी महिलांना बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. “विमा सखी” उपक्रम महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा पाऊल ठरू शकतो. महिलांना विमा सल्लागार म्हणून पहिल्या वर्षी ७,००० रुपये अतिरिक्त कमिशन मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी मदत होईल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा रत्नागिरीचे सुदर्शन पाटील आणि शुभांगी मालवणकर यांचे योगदान मोलाचे होते. तसेच, जिजाऊ संस्थेचे श्री मंदार नैकर (तालुकाप्रमुख), श्री अशोक बाविस्कर, श्री विपुल वाकचौरे यांच्यासह अनेक महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
या मोहिमेत अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.