रत्नागिरी:- जिजाऊ तर्फे महिला सक्षमीकरण अंतर्गत लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी पावस पंचक्रोशीत मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण सुरु करणेत आले आहे. तसेच महा-ई-सेवा केंद्र देखील सुरू करणेत आले. सदरचे सर्व प्रकल्प हे संस्थापक मा.निलेशजी सांबरे साहेब यांचे संकल्पनेतून व सचिव केदार चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली सुरू करणेत आले आहेत.
दिनांक 05/12/2024 रोजी या प्रकल्पाचे तोणदे ता.जि. रत्नागिरी येथील समाजसेवक व आंबा व्यावसायिक श्री.चंद्रशेखर उर्फ बंटी महाकाळ यांच्या हस्ते आज उद्धाटन करणेत आले. त्यावेळी पंचक्रोशीतील जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, पूर्णगड सरपंच सौ. सुहासिनी धानबा मॅडम, मेर्वी सरपंच श्री शशिकांत म्हादये, सिद्धेश चिंदाणे, पावस विभाग अध्यक्ष श्री सुनील डोंगरे, अमित नैकर, अभी डोंगरे, वैभव खर्डे, ग्रामपंचायत सदस्य अजय पानगले , विराज पानगले, संतोष कुरतडकर, महेंद्र नानरकर, प्रशिक्षण शिक्षिका अंकिता नाचणकर, गौरी पावसकर, स्वप्नाली जोशी तसेच रत्नागिरी येथील मुख्य प्रशिक्षिका रिशा शेख हजर होत्या तसेच जवळपास 40 महिलांनी आज प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, यांनी जिजाऊ शैक्षणिक व आरोग्य सेवा याच बरोबर महिला सक्षमीकरण या विषयावर कश्या पध्दतीने काम करत आहे हे थोडक्यात सांगितले तसेच जर समाज बळकट करायचा असेल तर महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर सक्षम झाले पाहिजे असे सांगितले. जास्तीत जास्त महिला भगिनींनी या शिलाई मशीन प्रशिक्षण चा तसेच महा-ई-सेवा केंद्र चा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने केले आहे.