जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे पाली येथील मराठा मंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे मोफत करिअर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न!

0
67

संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री. निलेश सांबरे यांच्यातर्फे कोकणातील पाच जिल्ह्यात २५ लाख वह्यांचे मोफत वाटप सुरू.

पाली (रत्नागिरी):- दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील मराठा मंदिर संस्थेच्या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मोफत करिअर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप कार्यक्रम जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केला गेला. सदर कार्यक्रम दोन सत्रा मध्ये पार पडला. पहिल्या सत्रामध्ये इयत्ता ११ वी व १२ वीच्या तर दुसऱ्या सत्रामध्ये ९ वी १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप केले गेले.

संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड. महेंद्र मांडवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री केदार चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून आम्ही वंचित राहू देणार नाही अशी ग्वाही दिली. संस्थेचे प्रकल्प संचालक श्री संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केलं.

गावातील उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना अपारंपरिक व विविध करियरच्या संधींबद्दल जागृत केले. शाळा स्तरीय, स्पर्धा परीक्षा ,दहावी व बारावी नंतर काय? MPSC / SSC /बॅंकिंग व कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनिअरिंग /NDA/SPI/TISC अश्या अनेक संधीची सविस्तर माहिती दिली त्यानंतर चर्चासत्र देखील आयोजित केले गेले होते. ग्रामीण खेड्यात अशा प्रकारचे मोफत करिअर मार्गदर्शन व मोफत वह्या वाटप शिबिरे आम्ही जिजाऊ संस्थेतर्फे यापुढे देखील आयोजित करणार असून करिअर मार्गदर्शन योग्य पद्धतीने योग्य वेळी विद्यार्थ्यांना दिले गेले तर कोकणातील विद्यार्थी स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवतील व स्वतःचा विकास घडवतील, असा आशावाद श्री. संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी जेईई व नीट परीक्षेचे क्लासेस देखील मराठा मंदिर येथे सुरू करावे अशी मागणी जिजाऊ संस्थेकडे केली. सदर क्लासेस साठी रत्नागिरी या शहराच्या ठिकाणी जावे लागते, तो त्रास विद्यार्थ्यांचा वाचेल याकरिता प्रयत्न करावे असे विद्यार्थ्यांनी संस्थेला सुचवले. यावर श्री. संदीप पाटील यांनी जेईई व नीट चे क्लासेस दर शनिवारी व रविवारी घेण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. मराठा मंदिरच संस्थेचे मुख्याध्यापक श्री. सुदेश कांबळे यांनी सदर विद्यार्थी हिताच्या उपक्रमांबद्दल जिजाऊ संस्थेचे आभार व्यक्त केले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश सांबरे यांच्या जन हिताच्या, गरीब, गरजू व वंचित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या हितार्थ हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमांना मराठा मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे भविष्यात सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी संस्थेचे महाराष्ट्र सचिव केदार चव्हाण कायदेशीर सल्लागार अॅड. महेंद्र मांडवकर, प्रकल्प संचालक संदीप पाटील, जिल्हा जनसंपर्क अधिकारी मंदार नैकर, जिजाऊ संस्थेचे सदस्य अक्षय बारगुडे, प्रतीक खरात, साईराज कोलते, माजी विद्यार्थी साहिल गोरे, माजी विद्यार्थी सानिया सावंत, पाली येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पांचाळ, दिनेश धाडवे, मुख्याध्यापक श्री. सुदेश कांबळे, शंकर जाधव सर, श्री. पालकर सर, श्री मयेकर सर, पर्यवेक्षिका भावे मॅडम, सौ. सावंत मॅडम, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. चव्हाण सर, इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, आदि मान्यवर उपस्थित होते.


शेकडो विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक, इत्यादींच्या उपस्थितीत मोफत वह्या वाटप व मोफत करियर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here