दापोली:- शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील १४ वर्षीय मुलींच्या गटात उपविजेता ठरला आहे. सदरच्या स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथील जवाहर क्रीडांगण येथे पार पडल्या. या स्पर्धेतील उत्तम कामगिरी करणाऱ्या ए.जी.हायस्कूलच्या कुमारी श्रेया मोरे व पूर्वा नरवणकर यांची विभाग स्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक योगेश खोत, अर्जुन घुले, अमित वाखंडे, दूर्वा डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी व त्यांचे मार्गदर्शन शिक्षक यांचे शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर, मुख्याध्यापक एस. एम. कांबळे, उपमुख्याध्यापक डी.एम.खटावकर, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.