कसबा (संगमेश्वर):- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संगमेश्वर जवळच्या कसबा येथे श्रीदेव टोळ भैरव मंदिरात 2 डिसेंबर रोजी टोळभैरव उत्सव उत्साहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संगमेश्वर, राजापूर, लांजा, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, पुणे आदी शहरातील भक्तमंडळी याठिकाणी येऊन देव दर्शन घेतले. टोळभैरव उत्सवानिमित्त 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजता श्री देव टोळ भैरवाची पूजा , 11 ते 12 मंत्राद्वार आणि अभिषेक 12 ते 1 वाजता धुपारती पंचारती जप नैवेद्य पुष्पा दर्शन 1ते 3 महाप्रसाद 3 ते 5 नागेश्वर भजन मंडळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाचे सर्व नियोजन उदय संसारे आणि संजय संसारे हे करत असून दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेला आहे