देवरूख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य कै. द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ तेवीसाव्या विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन आठल्ये, सप्रे, पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात १० डिसेंबरला सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
स्पर्धा उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेमध्ये कोकण विभागातील (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील) कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धेच्या दिवशी सर्व सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांचे स्पर्धेत सहभागी होत असल्याचे पत्र घेऊन यावे लागेल. स्पर्धा १० डिसेंबरला सकाळी १० वा. सुरू होईल. कथेचा विषय- युद्ध कथा- ऐतिहासिक/पौराणिक/जागतिक व भारतीय सैन्य कथा). प्रत्येक स्पर्धकाला कथाकथनासाठी किमान ७ मिनिटे व कमाल १० मिनिटे वेळ दिला जाईल.