जाकादेवी:- खालगाव (जाकादेवी) ते राई खापरेवाडी. जिल्हा इतर मार्ग रस्ता १२७, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन व पाटी लावण्यात आली. परंतु अजूनही त्या रस्त्याचे काम चालू झालेले नाही. शासन प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे तेथील ग्रामस्थांचे खूप हाल झालेले आहेत. खालगाव (जाकादेवी) ते राई खापरे वाडी पर्यंत एस. टी. दररोज जायची, परंतु यावेळी एस. टी सुद्धा अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मागे येते (पुलावरून परत येते) कारण पुढे जायला रस्ता उरला नाही फक्त खड्डेच आहे.
ग्रामस्थ, शाळेतील मुले, दवाखान्यात वगैरे जाण्यासाठी गैरसोय होतेय कारण या रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम हे दोन ते तीन वर्षापासून चालूच आहे.या वर्षी दोन वेळा खड्डे बुजवण्यात आले. तेथील स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्त्यातील खड्डे भरून काढतात. गेली १० वर्षे ग्रामस्थ या रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. हा मुख्य रस्ता खालगाव व राई असे दोन गावांना जोडणारा असल्यामुळे गावातील लोकांचे हाल होत आहे.