पाली (रत्नागिरी):- राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार श्री. किरण उर्फ भैय्या सामंत यांची खानवली येथील ग्रामस्थांनी पाली येथील निवासस्थानी विशेष भेट घेतली. यावेळी खानवलीचे सरपंच गणपत मांडवकर, उपसरपंच प्रदीप गारडी, भाजप भटके विमुक्त आघाडीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अनंत खरात, भाजप शक्ती केंद्र प्रमुख अनंत चौघुले, शाखा प्रमुख दिलीप गुरव, नवलादेवी ट्रस्ट कमेटीचे सचिव शांताराम शेलार, विश्वस्त सुरेश गारडी, विजय शिंदे, गिरीश गुरव, प्रकाश गुरव, सुर्यकांत गुरव आणि गावातील ग्रामस्थ व सहकारी उपस्थित होते.

या भेटीत ग्रामविकास, स्थानिक समस्या, आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली. आमदार किरण सामंत यांनी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.