कोकण रेल्वेच्या गौरवशाली प्रवासाचे पुस्तकात दर्शन! कॉफी टेबल बुकचे प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रकाशन.

0
7

बेलापूर, २० जून २०२५ – कोकण रेल्वेच्या वैभवशाली वाटचालीचा नजारा उलगडणारे भव्य ‘कॉफी टेबल बुक’ आज बेलापूर येथील मुख्य कार्यालयात एका खास समारंभात प्रकाशित करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते श्री. सचिन पिळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रकाशन संपन्न झाले.

यावेळी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा, संचालक (प्रचालन व व्यवसाय) श्री. सुनील गुप्ता, आणि जनसंपर्क प्रमुख श्री. गिरीश आर. करंदीकर, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

ही कॉफी टेबल बुक म्हणजे कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी चमत्कारांची, निसर्गसौंदर्याची आणि या रेल्वेने कोकणच्या विकासात घडवलेल्या क्रांतीची चित्रमय कहाणी आहे. देखण्या छायाचित्रांसह सादर करण्यात आलेल्या या पुस्तकात, कोकण रेल्वेचा धाडसी प्रारंभ, त्यातील तांत्रिक कौशल्य आणि कोकणच्या जनजीवनावर झालेला सकारात्मक परिणाम याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

यासोबतच देशभरात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करत कोकण रेल्वेने एक आघाडीचे पायाभूत संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे, हेही या पुस्तकातून अधोरेखित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here