क्षत्रिय मराठा मंडळाच्या वधू-वर मेळाव्याला प्रतिसाद.

0
31

रत्नागिरी:- येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्यावतीने आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली. वधू आणि वर यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. मेळाव्याची सुरवात मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सतिशराव साळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, एमबीएफ रत्नागिरी चॅप्टर अध्यक्ष समीर इंदुलकर, आशा साळवी, प्रमोद निकम, संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष तावडे यांनी वधू-वर व पालकांना मार्गदर्शन केले. विवाह जमण्याच्यादृष्टीने सद्यःस्थितीतील अनुभव, अडचणींवर मात करून तडजोडीने विचार करून विवाह जमवण्याच्यादृष्टीने पुढे पाऊल टाकण्याबाबत मार्गदर्शन केले. उत्कृष्ट वधू-वरांसाठी स्वतःचा उत्तम परिचय करून देणाऱ्या वधू-वरांना बक्षिस जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे वधू डॉ. सिद्धी चाळके व वर सौरभ माने यांची निवड करण्यात आली व त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here