लांजा:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी 25 लाख मोफत वह्या वाटप उपक्रम राबवला जात आहे. लांजा तालुक्यातील ऋण येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या देऊन संस्थेच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
सरपंच सुहास साखरकर, उपसरपंच रमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.