रत्नागिरी:- आज दिनांक १६/११/२०२४ रोजी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्यातर्फे शामराव पेजे यांच्या पवित्र स्मृतीला स्मरून माळनाका येथील शामराव पेजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष अँड. महेंद्र मांडवकर, तालुकाध्यक्ष श्री मंदारजी नैकर, जिजाऊ सदस्य श्री सचिन गोताड, श्री. साहिल रेवाळे, श्री साहिल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.